माझे मत पहिल्यांदा मांडताना मला जो आनंद होत आहे तो अवर्णनीय आहे .लोकशाही मध्ये लोकांच्या मताला फार किंमत आहे ,असे म्हटले जाते .परंतु राज्यकर्ते खरंच जनतेच्या मताला किंमत देतात का ?
याचे उत्तर दुर्दैवाने नाही असे च आहे .पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत जनतेचे मतदान मिळविण्या साठी खोटी नाटी आश्वासने देऊन एकदा सत्ता मिळाली कि जनतेच्या मताला कवडीची किंमत राहत नाही .
१०० दिवसात महागाई कमी करू हे मुख्य आश्वासन देऊन निवडून आलेल्या सरकारात महिन्या भरात डाळ, साखर, खाद्य तेल, कांदे आदी जीवनावाशक गोष्टींचे भाव गगनाला भिडले.ह्याची सरकारला ना लाज ना शरम.
आणि जर कोणी ह्या प्रश्नावर आदोलन केले तर मग पोलिसी बळ वापरून त्यांना झोडपून काढायचे .
म्हणून मला असे वाटते कि आपली लोकशाही नसून हे शाहीलोक झाले आहे .सत्ताधारी म्हणतील तेच खरे बाकी सर्व कवडी किंमत .
No comments:
Post a Comment