Saturday, 16 April 2011

भ्रष्टाचार म्हणजे नक्की काय ?

भ्रष्ट राजकारण्यांना टार्गेट केले कि आपण स्वच्छ असा काही लोकांचा समज आहे .पण तो कितपत बरोबर आहे
     .   भ्रष्ट राजकारण्या वर टीका करण्या पूर्वी जनतेने एक गोष्ट मान्य केली पाहिजे कि आपल्या च मता मूळे तो निवडून आलेला आहे. निवडणूक काळात त्याने वाटलेली भेटवस्तू  मी घेतली आहे ,त्याने पाजलेली दारू मी प्यालो आहे मतदानाच्या आदल्या दिवशी त्याने दिलेले पैसे मी घेतले आहेत .पण आता तो निवडून आला आणि निवडणुकीचा खर्च वसूल करण्या साठी  भ्रष्ट चार करू लागला तेव्हा मी त्यावर टीका  करत आहे .
 सर्व सामान्य जनतेच्या मनात राज कारणी लोकांबद्दल एक अढी बसलेली आहे .ती बऱ्याच अंशी खरी आहे.
        जनतेच्या मनातील राजकारण्या च्या बद्दल च्या ह्या चिडीचा फायदा हे स्वयंघोषित भ्रष्टाचार विरोधी योद्धे घेतात .त्यांना कोणाच्या शंकेचे निरसन करायची गरज नसते ,ते जे म्हणणार ते सर्व खरे .
          भ्रष्टाचार विरोधी लढाई जिंकून अण्णा विमानाने दिल्ली ते पुणे प्रवास करतात ,पुण्याहून ६० -७० गाड्यांच्या ताफ्या निशी राळेगण ला येतात .गावात दिवाळी चे वातावरण ,फटाक्यांची अति प्रचंड आतिषबाजी ,गावात तीन क्विंटल लाडू वाटप होते ,या सर्वांवर होणारा लाखोंचा खर्च कोण करते ? ह्यात काही पाणी मूरते का हे कोणी पाहायचे .
कि हे भ्रष्टाचारा विरोधात लढतात म्हणून ह्यांना सर्व माफ .
भ्रष्टाचार म्हणजे नक्की की ह्याचा एकदा सोक्ष मोक्ष होऊन जाउद्या.


Tuesday, 12 April 2011

माझे मत पहिल्यांदा मांडताना मला जो आनंद होत आहे तो अवर्णनीय आहे .लोकशाही मध्ये लोकांच्या मताला फार किंमत आहे ,असे म्हटले जाते .परंतु राज्यकर्ते खरंच जनतेच्या मताला किंमत देतात का ?
याचे उत्तर दुर्दैवाने नाही असे च आहे .पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत जनतेचे मतदान मिळविण्या साठी खोटी नाटी आश्वासने देऊन एकदा सत्ता मिळाली कि जनतेच्या मताला कवडीची किंमत राहत नाही .
१०० दिवसात महागाई कमी करू हे  मुख्य आश्वासन देऊन  निवडून आलेल्या सरकारात महिन्या भरात डाळ, साखर, खाद्य तेल, कांदे आदी जीवनावाशक गोष्टींचे भाव गगनाला भिडले.ह्याची सरकारला ना लाज ना शरम.
आणि जर कोणी ह्या प्रश्नावर आदोलन केले तर मग पोलिसी बळ वापरून त्यांना झोडपून काढायचे .
म्हणून मला असे वाटते कि आपली लोकशाही नसून हे शाहीलोक झाले आहे .सत्ताधारी म्हणतील तेच खरे बाकी सर्व कवडी किंमत .